छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) :
पदमपुरा भागातील सराईत गुन्हेगार तुषार सुंदरलाल मेहरा (२८, रा. संत रोहिदास चौक, मोची मोहल्ला) याच्यावर पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली. कारवाईनंतर गुंड तुषार मेहरा याची रवानगी नागपूर मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.
तुषार मेहरा याच्यावर वेदांतनगर आणि छावणी पोलिस ठाण्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी रेकॉर्डवर खून, घातक शस्त्रांनी जबर दुखापत करणे, जमाव जमवून दंगा करणे, प्राणघातक हत्याराने दहशत माजवणे, अवैध दारू वाहतूक व विक्री, चोरी आणि गृहअतिक्रमण यासारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. पोलिसांनी यापूर्वी त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. तसेच हद्दपारही केले.
मात्र, त्याने गुन्हे करणे सुरूच ठेवले होते. अखेर पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी त्याच्या स्थानबद्धतेचा आदेश जारी केला. शनिवारी (दि. १९) त्याला हा आदेश तामील करून त्याची नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली.
https://epaper.sanjwarta.in/
Powered By: Vrudhee Solutions












